मुख्यमंत्री यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नियुक्ती

जळगावात वृक्षारोपण करून दिल्या अनोख्या शुभेच्छा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख तसेच माजी पत्रकार मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंत्रालयात नियुक्ती झाल्याबद्दल मेहरूण परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून  व लावलेल्या झाडांची संवर्धनाची जबाबदारी घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व संवर्धनाच्या मोहिमेला मेहरूण येथील देशपांडे हॉस्पिटलपासून सुरूवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १००  वृक्षाची लागवड केली असून दुसऱ्या टप्प्यात २०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी  शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे, भावेश ढाके, मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक गणेश सोनवणे,  शिवसेना जळगाव माजी महानगर संघटक दिनेश जगताप, माजी युवासेना जिल्हा अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवराज पाटील,  केतन पोळ व शेखर कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते रिजवान जहागिरदार, रियाज देशपांडे तसेच यांसह   शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हा समन्वयक राजेंद्र सपकाळे, शहर समन्वयक विशाल परदेशी, सह समन्वयक,  सागर सोनवणे, अनिल पवार, राहुल पाटील, दीपक पाटील, रोशन ठाकरे, विशाल निकम, शुभम सपकाळे, आरोग्यसेवक अख्तर अली सय्यद यांसह वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे समन्वयक, आरोग्यसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.