मुक्ताईनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रमांच आयोजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

 

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विवेक सोनवणे यांनी ऊस तोडणाऱ्या तांड्यावरील गरजू महिलांना साडी चोळी भेट देऊन महिलांचा सन्मान केला. याप्रसंगी डॉ. सोनवणे म्हणाले की, तरुण पिढीने छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे तसेच आपल्या आई-वडिलांची सेवा करणे हा खरा आपला धर्म आहे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विवेक सोनवणे केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राम रोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा प्रभारी प्रमोद सोनवणे, पत्रकार अमोल वैद्य, किरण महाजन, मंगेश काटे, संदीप पाटील, सुरेश पाटील, उत्तम जुमडे, वैभव इंगळे, तुकाराम पाटील यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!