मुक्ताईनगर येथे मराठा समाजातर्फे जोडो मारो आंदोलन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  नेहमीच वादग्रस्त विधान करणारे महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन आज मुक्ताईनगर मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

 

संपुर्ण जगाच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल भगतसिंग कोश्यारी यांचं विधान अक्षम्य आहे अश्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी राहण्याचा अधिकार नाही. एका संविधानिक  पदाच्या आडून अश्या बेताल वक्तव्य करणार्‍याचा राजिनामा द्यावा व महाराष्ट्राबाहेर हद्दपार करा अशी मागणी आज तहसीलदार व पोलिस निरीक्षक मुक्ताईनगर यांना या संदर्भात निवेदन देऊन करण्यात आली. प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्याचे मराठा समाजाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख तालुका सहसचिव इंजिनिअर संदीप बागुल तसेच दिनेश कदम ईश्वरभाऊ राहणे, नगरसेवक वसंता वलभले, दिलीप श्रीराम पाटील सर, राहुल दिनकर देशमुख, शिवराज पाटील,लीलाधर पाटील, संचालक वाघ निमखेडी, उमेश पाटील ढोरमाड, ललित बाविस्कर, रवींद्र दांडगे,मराठा युवक चे जयेश पाटील, गणेश विश्वनाथ पाटील,मितेशराजे विजय पाटील, प्रदीप शामराव पाटील, समाधान रामभाऊ पाटील, वैभव भिकाजी कोल्हे, प्रमोद सौंदाळे, कृष्णा सुभाष पाटील, दीपक सपना पाटील, निलेश देवानंद पाटील, ज्ञानेश्वर सुभाष वाघ, सचिन बाळू पाटील, उमेश युवराज पाटील, ईश्वर संतोष घाटे, सागर गजानन पाटील, शरद गुलाब पाटील, चेतन रघुनाथ पाटील, प्रदीप शांताराम पाटील, दामोदर तुळशीराम पाटील, दीपक शालिकराम पाटील, तानाजी वसंत पाटील राजेंद्र कापसे, मराठा समाजातील असंख्य समाज बांधव ऊपस्थित होते.

 

Protected Content