मुक्ताईनगर : एक लाखाचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त : दोन आरोपींना अटक

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या पियुश हळदे याला राज्य उत्पादन विभागाच्या भुसावळ पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटर सायकल असा एकुण रु. १,०२,८६२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर एका मोटर सायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त खबर राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ विभागाच्या पथकाला मिळाली होती. यानुसार पथकाने सापळा रचून मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर एक मोटर सायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना पियुश हळदे यांस अटक केली. पुढील तपास केला असता हॉटेल साई गजानन ढाबा येथुन बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटर सायकल असा एकुण रु. १,०२,८६२/- किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला. पियुश गणेश हळदे (वय २५ वर्ष रा.मुक्ताईनगर) व अनंत गणेश वाढे (रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांर्तगत कारवाई करुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई काल करण्यात आली. या कारवाई त अवैध मद्यसाठा मिळुन आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश निं. सोनार,तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान व वाहनचालक सागर क. देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ जवान विठ्ठल हाटकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!