मुक्ताईनगरातील खदानबर्डी भागातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ

 

 

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  । शहरातील खदानबर्डी भागातील सिमेंट रस्त्याच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे . नगरसेविका सविता  भलंभले यांनी या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता

 

मुक्ताईनगर येथील खदानबर्डी भागातील प्रभाग क्रमांक 14 येथे बऱ्याच वर्षापासून रस्त्याची समस्या होती  प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका सविता  भलभले यांनी वेळोवेळी पाठपुरावा  करून नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामे अंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करून आणला  लक्ष्मण भोई यांच्या घरापासून ते गायत्री प्रोव्हिजनपर्यन्तचा हा रास्ता  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत मंजूर करण्यात आला  त्या कामाची आज प्रत्यक्ष सुरुवात झाली

 

रस्त्याच्या चांगल्या प्रतिमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी नगरसेवकपुत्र तथा शिवसेना शहर संघटक वसंत भलभले या ठिकाणी हजर होते  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता  एस.ए. शेजवळ यांनी भेट देऊन कामगारांना सूचना दिल्या प्रभाकर कोळी , विनोद सुरंगे, लक्ष्मण भोई, नरेंद्र सापधरे (सर), वैभव काठोके , निलेश घटे , चेतन पाटील , सुभाष दैवे , अरुण काळे , मधुकर निळे, विजय भोजने, संजय वानखेडे,  विकास भगत , विनोद पवार , नामदेव गोरले , पुरुषोत्तम पोलाखेरे व प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.