मुंबई (वृत्तसंस्था) जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्यावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासात ७०५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत विमानतळाचा विकास आणि व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीजचे (GVK) अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचे चिरंजीव संजय रेड्डी यांच्यासह एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे काही अधिकारी आणि नऊ कंपन्यांविरोधात ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘सीबीआय’ने केला आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जीव्हीके आणि इतर कंपन्यांनी जवळपास ७०५ कोटींचा घोळ केला आहे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय विकासाच्या नावाखाली विमानतळ परिसरातील २०० एकर जमीन देखील हडप केली आहे असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतर एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की साल २०१७-१८ मध्ये या सर्व आरोपींनी एअरपोर्ट दुरुसती आणि डेव्हल्पमेंट कामांसाठी ३१० कोटीचे बोगस कॉनट्रॅक्ट केले आणि हे पैसे भारता बाहेर परदेशात वेग वेगवेगळ्या कंपनींमध्ये गुणतवले. विमानतळ विकासात काही कंत्राटे केवळ पैसे लाटण्यासाठी करण्यात आली, असा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर मधील माहितीनुसार खासगी कंपन्यांना दिलेली कंत्राटे केवळ कागदावर होती. प्रत्यक्षात ती कामे पूर्ण झाली नाहीत.