मुंबईत शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड; वॉर्डबॉयला अटक

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईतील जे जे रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर आला आहे. जे.जे. हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ महिला डॉक्टरसोबत छेडछाड झाली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयातीलच वॉर्डबॉयने ही छेडछाड केल्याचा आरोप आहे

store advt

30 वर्षीय शिकाऊ महिला डॉक्टर नाईट शिफ्टमध्ये काम करत होती. त्यावेळी 45 वर्षीय वॉर्डबॉय मागून आला आणि त्याने या डॉक्टरला पकडून, तिची छेडछाड केली. याप्रकाराने भयभीत झालेल्या डॉक्टरने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला. यानंतर डॉक्टरांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर, वरिष्ठांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आरोपीवर कायदेशीर केली.

याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये वॉर्ड बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. यापूर्वी एका मारहाण प्रकरणात त्याच्यावर गुन्हा आहे. त्यानंतर आता याच वॉर्डबॉयविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे. अटकेत असलेल्या या वॉर्डबॉयविरोधात पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

error: Content is protected !!