मुंबईत आजपासून १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईत १ जुलै मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

store advt

मिशन बिगीन अंतर्गत सरकारने मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसेच प्रामुख्याने मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.दरम्यान, ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

error: Content is protected !!