मी कसा येतो हे तुम्हाला माहित आहे ! : फडणविसांची फटकेबाजी

चंदगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील भाषणात ‘मी येणार म्हटले की येतो, आणि मी कसा येतो हे तुम्हाला माहित आहे !’ अशा शब्दांमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून फडणवीस चंदगड तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येथे बोलतांना फडणवीस म्हणाले की, ’मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो !

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय अनिश्‍चीतता सुरू असून पुढे नेमके काय होणार हे कुणालाच कळेनासे झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येणार ! या त्यांच्या गाजलेल्या आणि प्रचंड टिका देखील झालेल्या वक्तव्याला नव्याने म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content