मित्रानेच केला मित्राचा खून ! ; गाडेगाव शिवारातील घटना

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गाडेगाव परिसरातील एका विहिरीत एका तरूणाचा मृतदेह ८ ऑक्टोबर रोजी आढळून आला होता. या तरूणाचा खून करून विहिरीत फेकून देणाऱ्या मित्राला जामनेर पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, गाडेगाव शिवारातील एका विहिरीत ८ ऑक्टोबर रोजी अनोळखी म्हणून एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर राहूल पंढरी पवार (वय-२४) रा. नेरी बुद्रुक ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव असल्याची ओळख पटली. त्यांच्या गळ्याला दोरी असल्याचे निदर्शनास आले. जामनेर पोलीसांनी तपासाची चक्रफिरवत त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी राहूल पवार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यांच्या माहितीनुसार संशयित म्हणून समाधान नारायण कुमावत रा. नेरी बुद्रुक ता. जामनेर याला याला ताब्यात घेतले. दरम्यान आपणच राहूल पवारचा खून केला असल्याची कबुली समाधान कुमावत याने दिली आहे. राहूल पवार यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समाधान कुमावत यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटनेचा तपास पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, पोलीस कॉन्स्टेबल रमेश कुमावत, नीलेश धोके, तुषार पाटील, अतुल पवार, संदीप पाटील आदींच्या पथकाने केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!