जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला माहेराहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणावे अशी मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील माहेर असलेल्या मेहरून निसा शेख कलीम वय-१९ यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील कलीम शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्न झाल्यापासून विवाहितेला कोणत्या न कोणत्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर विवाहितेला मोहराहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्याची मागणी केली. त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून पतीसह सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी मास्टर कॉलनी येथ निधून आल्या आहेत. शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता तक्रार दिली. त्यानुसार पती कलीम शेख सलीम, सासू तायराबी शेख सलीम, सासरे सलीम शेख, दीर शाहानवाज शेख सलीम सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश, ननंद नाजमीनबी आसीफ शेख आणि नंदोई भाऊ आसीफ शेख दोन्ही रा. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.