मायादेवी नगरात घरासमोर लावलेली चारचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । घराबाहेर उभी केलेली चारचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मायादेवी नगरात आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रवींद्र हरी पाटील (रा.मायदेवीनगर) यांच्या मालकीची ही चारचाकी (एमएच १९ सीएफ २१०९) आहे. सोमवारी रात्री ९.३० वाजता पाटील यांनी चारचाकी लॉक करुन घराबाहेर उभी केली होती. त्यानंतर रात्री रविंद्र पाटील व कुटुंबिय जेवण करून रात्री ११ वाजेच्या सुमारास झोपले. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी सकाळी ६ वाजता ते घराबाहेर आले असता चारचाकी मिळुन आली नाही. कारचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आली नाही. तर चोरट्यांनी रात्रीतून ही चारचाकी चोरली असल्याची खात्री झाली. या प्रकरणी रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.