मानमोडी येथे मुसळधार पावसामुळे घरकुलचे प्रचंड नुकसान (व्हिडीओ)

बोदवड सुरेश कोळी ।  मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आदर्शगाव मानमोडी येथील घरकुल लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने घरकुल लाभार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. 

याबाबत अधिक असे की, ०४ सप्टेंबर रोजी सायंकाळी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस एवढा जोरदार झाला की, तालुक्यातील आदर्शगाव मानमोडी येथील घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल सामुग्री साहित्य पाण्यात वाहून गेल्याने घरकुल लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एकीकडे शासन घरकुल बांधण्यासाठी देत असलेला निधी हा घरकुल बांधकाम करण्यासाठी आधीच अपुरा पडत असून त्यात या मुसळधार झालेल्या पावसाने घरकुल लाभार्थ्यांचे विटा,रेती यांसह घरकुल बांधकाम सामुग्री पाण्यात वाहून गेल्याने घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक संकटात सापडले आहेत.

तालुक्यातील आदर्शगाव मानमोडी येथील सन २०१७/२०१८ येथे रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत चंद्रकांत वाघ, मिलिंद वाघ, कमलबाई रमेश खराटे,सागर भास्कर वाघ, साहेबराव वाघ,रोशन प्रकाश वाघ, सिध्दार्थ इंगळे, मनोज वाघ, गोपाळ वाघ, यांचे घरकुल मंजूर असून दि.०४ रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे या घरकुल लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरकुल सामुग्री पाण्यात वाहून गेल्याने त्यावर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे शासन घरकुल बांधण्यासाठी जो निधी देत आहे.तो वाढलेल्या महागाईमुळे अपुरा पडत असून त्यात भर म्हणून मुसळधार पावसामुळे घरकुल सामुग्री पाण्यात वाहून गेल्याने घरकुल लाभधारक दुहेरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरकुल लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उपस्थित सरपंचपती मोहन पाटील, उपसरपंच विशाल इंगळे, माजी उपसरपंच जगदिश कोळी यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!