माथेफिरुंचा प्रताप : आदर्श नगरात जाळले नऊ वाहने

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आदर्श नगरात पाहटेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरासमोरील वाहने अज्ञातांनी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आदर्श नगर प्लॉट क्रमांक १८६ आराध्या अपार्टमेंट डी मार्टच्या मागील बाजूस व बाजूच्या घरांच्या कंपाऊंडमधील ठेवलेल्या वाहनांना आग लागली अज्ञाताने आग लावली. याबाबत अशोक राणे यांनी फोनद्वारे अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी गेले असता नागरिकांनी परस्पर आग विझवली होती. यात आगीत सेन्ट्रो एमएच १९ एपी १३४५ व क्रेटा एमएच १९ सीव्ही ९४४० व इतर दोन मोटर सायकलींना आग लावण्यात आली होती.
दरम्यान, आदर्श नगरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये देखील वाहनांना आग लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत पूजा पंजाबी यांनी अग्निशमन दलास कळविले होते. यात सृष्टी अपार्टमेंटमध्ये एक मोटर सायकल व एसडी हाईट्समध्ये एक चारचाकी व तीन मोटरसायकल जाळण्याचा प्रकार उघड झाला आहे. यात एमएच १९ के ४२३६ क्रेटा व तीन दोन चाकी वाहनांचा समावेश आहे. यात आदर्श नगर परिसरात एकूण ६ दुचाकी व ३ कार जळून खाक करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाचे वाहन चालक विक्रांत घोडेस्वार,वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक वसंत दांडेकर, फायरमन भगवान जाधव, रवी बोरसे यांनी आग विझवली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!