माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार ! : संजयकाका पाटील

सांगली प्रतिनिधी | आपण भाजपचे खासदार असल्यामुळे आपल्यामागे कधीही ईडी लागणार नसल्याचे वक्तव्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले असून यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

 

काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपमध्ये आल्यानंतर शांतपणे झोप लागत असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप झाले होते. आता अगदी त्याच प्रकारे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका कार्यक्रमात खासदार पाटील म्हणाले की, आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असे वक्तव्य देखील त्यांनी याप्रसंगी केले.

Protected Content