माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास : रिया चक्रवर्ती

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल, असे एका व्हिडीओच्या माध्यमातून रियाने पहिल्यांदा सुशांतच्या आत्म्हत्येनंतर तिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

store advt

 

या व्हिडीओमध्ये रियाने म्हटले आहे की, माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माझ्याबद्दल प्रसारमाध्यमात खूप वाईट गोष्टी बोलल्या जात आहे. पण माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, सत्यमेव जयते !, असे या व्हिडीओत रियाने म्हटले आहे. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रियाने खुलासा केला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!