माजी सैनिकांनी चौकीदार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक बहुउद्येशिय सभागृह, रावेर (जळगाव) येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी  पध्दतीने  चौकीदार-1 (पुरुष) हे पद माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत.

 

माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह 15 मे, 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी 0257-2241414 या दुरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content