माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण

शेअर करा !


लातूर (वृत्तसंस्था)
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे. 89 वर्षीय शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून लक्षणे जाणवत होती.

store advt

 

 

मागील काही दिवसांपासून निलंगेकरांना सर्दी, खोकला होता. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. निलंगेकरांच्या संपर्कात आलेल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!