मागील २४ तासांत देशात तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत देशात तब्बल १८ हजार ६५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे.

store advt

 

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये देशातील ८५.५ टक्के करोनाचे रुग्ण आहेत. तर देशात एकूण कोरोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ लाख ४७ हजार ९७९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!