मागील भांडणावरुन दोन जणांना लोखंडी पाईपसह चाकूने बेदम मारहाण

दहा जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथे एका कुटुंबातील दहा जणांनी मागील भांडणाच्या कारणावरुन दोन जणांना चाकू, लोखंडी पाईने मारहाण करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दहा जणांविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नशीराबाद शहरातील मोमीन मोहल्ला येथे आसीफ बिसमिल्ला पिंजारी वय ३२ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. आसीफ पिंजारी यांचा याच परिसरात राहणाऱ्या सादीक शहा आसीफ उल्ला शहा यांच्याशी जुना वाद आहे. २१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता आसीफ पिंजारी हे त्यांच्या घराच्या बांधकामावर पाणी मारत होते., याठिकाणी सादीक शहा यांच्यासह इतर काही जण आले. जुन्या वादातून सादीक शह, सलीम शहा, अक्रमशहा यांच्यासह इतरांनी आसिफ पिंजारी तसेच पिंजारी यांचा चुलत भाऊ शाकीर शरीफ पिंजारी या दोघांना चाकू तसेच लोखंडी पाईपने तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत दोघांना हाताला व डोक्याला दुखापत झाली आहे. यावेळी संबंधितांनी शिवीगाळ करत आसिफ पिंजारी यांना जीवे मारण्याची धमकी सुध्दा दिली. याप्रकरणी उपचारानंतर शुक्रवारी आसिफ पिंजारी यांनी नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन सादीक शहा आसिफ उल्ला शहा, सलीम शहा मुसा शहा, अक्रमशहा, सादीक शहा, वसीम शहा रहेमान शहा, मेहमूद समजौउद्दीन पिंजारी, फिरोज समजौउद्दीन पिंजारी, एजाज ऊर्फ हड्डू मेहबूब पिंजारी, शबाना बी सादीक शहा, यास्मीन बी फिरोज पिंजारी, आकिला बी सलीम शहा सर्व रा. मोमीन मोहल्ला, नशीराबाद या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नूर मोहम्मद अमजद खान हे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content