चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील रोहिणी येथील २२ वर्षीय महिलेला जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दोन जणांविरुद्ध ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथील एका २२ वर्षाच्या महिलेला काही कारण नसताना बाळू रघुनाथ नागरे व किरन किसन नागरे (दोघेही रा. रोहिणी ता. चाळीसगाव) या दोघांनी मद्यधुंद होऊन घरासमोर येऊन जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली.
ही घटना सोमवार रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्या महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि कलम- २९४, ५०४, ५१०, ३४ व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत वरील दोन्ही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे हे करीत आहेत.