महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

शेअर करा !

लखनऊ (वृत्तसंस्था) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोरच हस्तमैथुन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. भीष्मपाल सिंह यादव असे अटक केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

store advt

 

देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यात जमिनीचा वादावरून तक्रार नोंदवण्यासाठी एक महिला आली होती. पोलीस ठाण्याचे अधिकारी भीष्मपाल सिंह यादव यांच्याकडे घडलेला प्रकार सांगत असतांना त्याचवेळी अधिकाऱ्याने तिच्यासमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. यावेळी पिडीत महिलेसोबत असलेल्या तिच्या मुलीने या लज्जास्पद प्रकाराचा व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पिडीत महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर हा अधिकारी फरार झाला होता. अखेर भीष्मपाल सिंह यादवला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!