महिलांबद्दलची मानसिकता बदला- आदित्य ठाकरेंचा फडणविसांना सल्ला !

 

मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांनी महिलांबद्दलची मानसिकता बदलवावी असा सल्ला देऊन पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपनं काल मुंबईतील आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं. आंदोलकांना संबोधित करताना फडणवीस यांनी वेगवेगळ्या विषयांवर सरकारवर हल्ले चढवले. महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेवरही टीका केली होती. महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले होते.
या आरोपांना आज आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये आदित्य म्हणतात, मशक्यतो राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देण्याचं मी टाळतो. खरंतर फडणवीसांनी बांगड्या भरण्याचं जे वक्तव्य केलं आहे, त्याबद्दल माफी मागायला हवी. कारण, बांगड्या हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. सर्वाधिक मजबूत असलेला महिला वर्ग बांगड्या घालतो. राजकारण होतच राहील. पण आपल्या डोक्यातील काही संकल्पना आपण बदलायला हव्यात. माजी मुख्यमंत्र्यांना तर ही भाषा अजिबात शोभत नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!