महिलांनी केलेल्या मदतीने एका अनोळखी व्यक्तीचे वाचले प्राण

जळगाव, प्रतिनिधी | येथील आकाशवाणी चौकात जखमी अवस्थेतील अनोळखी व्यक्तीस नारीशक्ती गृप व पत्रकार सोनम पाटील यांनी माणुसकी व जागरूकता दाखवत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केल्याने त्या व्यक्तीस जीवदान लाभले आहे.

 

पत्रकार सोनम पाटील ह्या आकाशवाणी चौकातून जात असतांना त्यांना एक अनोळखी व्यक्ती जखमांनी विव्हळत पडलेला दिसला. त्यास एका पायाला झालेल्या गंभीर जखमांमुळे चालणेही शक्य नव्हते.यावेळी सोनम पाटील यांनी नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा मनीषा पाटील, सुमित्रा पाटील, विनोद जाधव यांच्या मदतीने १०८ क्रमांक ला कॉल करून सदर अनोळखी व्यक्तीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले.  डॉ. संदीप परदेशी, रुग्णवाहिका ( एमएच १४ सीएल ७९२ )  चालक किशोर शिरोळे यांनी आकाशवाणी  चौकातून या जखमी व्यक्तीस रुग्णालयात नेले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!