महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यास सुरतहून अटक

भुसावळ प्रतिनिधी । महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देवून सहा महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी सुरतहून अटक केली. 

अधिक माहिती अशी की, शहरातील ईदगाह डीपी खडका रोड येथे महावितरण कंपनीचे कर्मचारी पंकज कमलाकर पाटील रा. प्रभात कॉलनी भुसावळ हे १३ डिसेंबर २०२० रोजी लाईट दुरूस्तीचे काम करत असतांना संशयित आरोपी अबरार अहमद शकिल पटेल (वय-२६) रा.गौसिया नगर भुसावळ याने काहीही कारण नसतांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी अबरार हा फरार होता. संशयित आरोपी हा सुरत येथे असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सुरत येथून संशयित आरोपीला अटक केली. 

ही कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रमन सुरळकर, पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबर ईश्वर भालेराव यांनी अटक केली. पुढील तपास सपोनि मंगेश गोटला व पोलीस कान्स्टेबरल गजानन वाघ करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!