महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांची चोरी

पारोळा लाईव्ह ट्रेन्डस न्यूज प्रतिनिधी ।  पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात महावितरण कंपनीच्या विद्युत तारांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील मसवे शिवारातील डीपीच्या खंब्याजवळून ठेवलेल्या विद्युततारा ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४५ हजार रुपये किंमतीच्या विद्युततारा चोरून नेले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता रजनीश भटेश्वर सराफ (वय-३२) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करीत आहे.

Protected Content