महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी अनिल महाजन रुजू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । : महावितरणच्या जळगाव मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी  अनिल महाजन नुकतेच रुजू झाले आहेत.

अनिल महाजन यापूर्वी कल्याण परिमंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती झाली आहे. श्री.महाजन यांनी आपल्या कारकिर्दीत अति उच्च दाब उपकेंद्रासह पारेषण वाहिनी उभारणीत मोलाचा वाटा उचललेला आहे. तसेच त्यांनी अलिबाग (जि.रायगड), बदलापूर (जि.ठाणे ) उपविभाग, पनवेल ग्रामीण विभाग कार्यालय, रत्नागिरी विभाग, मुख्य कार्यालय मुंबई येथे वाणिज्य विभाग ( ओपन अॅक्सेस, सोलर रूफ टाॅप), परिमंडळ कार्यालय कल्याण येथे विविध पदांवर उल्लेखनीय काम केलेले आहे.

जळगाव मंडलात वीजग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. मंडलातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ग्राहकसेवा उंचावण्यावर भर देणार आहे, असे  अधीक्षक अभियंता अनिल महाजन  यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content