महाराष्ट्र वाणी युवा मंचतर्फे पाचोऱ्यात दिनदर्शिकेचे प्रकाशन

पाचोरा, प्रतिनिधी | शहरातील महाराष्ट्र वाणी युवा मंचच्या सन-२०२२ या दिनदर्शिकेचे प्रकाशन वाणी समाजाचे माजी सचिव व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक देव यांच्या हस्ते करण्यात आले.

 

महाराष्ट्र वाणी युवा मंचतर्फे आयोजित दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे संस्थापक अध्यक्ष डी. आर. कोतकर हे होते. प्रास्ताविक शाखाध्यक्ष अशोक बागड यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण सिनकर यांनी केले. प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे तसेच योगेश शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष महेंद्र महालपुरे , खजिनदार रमेश महालपुरे , विजय सोनजे, प्रवीण शेंडे, संदीप महालपुरे, विशाल ब्राह्मणकार यांनी कामकाज पहिले. याप्रसंगी आभार ज्येष्ठ संघटक किरण अमृतकर यांनी मानले. या कार्यक्रमास संजय शेंडे, राजेंद्र देव, विवेक ब्राह्मणकर, प्रकाश येवले, गणेश सिनकर, सुनील कोतकर आणि समाज बांधव उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!