महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण १०१ हे ५ जून ते १२ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निलेश राजूरकर, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही त्यांना विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची अनुमती देण्यात येणार आहे. असेही श्री. राजूरकर, सहसचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.