महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील तर पाचोरा शहराध्यक्ष भुवणेश दुसाने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाचे नगराज पाटील तर  पाचोरा शहराध्यक्ष पदाचे भुवणेश दुसाने यांना  संघटनेचे राज्य सरचिटणीस, विभागीय व जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.  खान्देश विभागातून पाचोरा शाखा संघटनेच्या वतीने पत्रकारांना छत्री, रेनकोट वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी कुरंगी तालुका पाचोरा येथील लोकमत पत्रकार नगराज माधवराव पाटील यांची नियुक्ती म. रा. मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले. यावेळी पाचोरा शहर संघटनेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील दर्शन पोलीस टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी भुवणेश दुसाणे यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या निवडीबद्दल नितिन पाटील, संदीप महाजन, प्रविण ब्राम्हणे, प्रा. सी. एन. चौधरी, अनिल येवले, दिलीप जैन, प्रमोद सोनवणे, महेश कौंडीण्य, प्रा. अमोल झेरवाल, विनायक दिवटे, सुनिल पाटील, विजय पाटील, मिलिंद सोनवणे, नंदू शेलकर, आत्माराम गायकवाड,  प्रशांत येवले , यशवंत पवार, राजेंद्र पाटील, भगवान पाटील, प्रमोद बारी आदी पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.