महाबळ परिसरात वाहनाच्या धडकेत महिला जखमी

रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉप जवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी भूषण जैतकर (वय-३०) रा. रायसोनी नगर, जळगाव या महिला १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शहरातील महाबळ भागातील नवजीवन सुपर शॉप जवळून दुचाकीने जात असतांना त्यांना समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात महिला जखमी झाल्या आणि वाहनाचेही नुकसान झाले आहे. या संदर्भात महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पवन ज्ञानेश्वर राठोड रा. वाघ नगर, जळगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय चौधरी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.