महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि पहेलवान महिला कुस्तीपटू यांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांवर कडक करवाई कराण्याच्यामागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या नावाच्या वेबसाईटवर मनुवादी वृत्ती असलेल्या लेखकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह लिखाण केले आहे. छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटविण्यात आला होता. याप्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसेच दिल्ली येथे न्याय व हक्कासाठी पहिलवान कुस्तीपटू यांच्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या खा. ब्रिजभूषण यांच्या कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येवून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनावर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, प्रतिभा शिरसाट, कल्पना पाटील, अश्विनी देशमुख, कल्पिता पाटील, सीमा राय, सुमन बनसोडे, निवेदिता ताठे, प्रेरणा सूर्यवंशी, महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील, एजाज मलिक, वाय.एस. महाजन, अशोक पाटील, दिलीप मोरेश्वरी, रिंकू चौधरी, इब्राहिम तडवी, रमेश बापट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content