महापालिकेत स्त्री संसाधन केंद्र समिती गठीत

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महानगरपालिकेतर्फे महिला व बाल कल्याण विभागा मार्फत सुरू होणाऱ्या स्त्री संसाधन केंद्रासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

स्त्री संसाधन समिती केंद्राच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागातर्फे स्त्री संसाधन केंद्र समिती गठीत करण्यात आली. नागरी समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवेदिता ताठे, मनिषा पाटील, व सामाजिक संस्थेच्या वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, मराठी प्रतिष्ठानचे अँड. जमील देशपांडे, आर्या फाऊंडेशनच्या छाया पाटील यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सदर निवडपत्र अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांच्या हस्ते देण्यात आहे. यावेळी महिला बाल कल्याण विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content