महापालिकेत लोकशाही दिनी १५ अर्ज दाखल

जळगाव, प्रतिनिधी ।  महापालिकेत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात १५ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. 

 

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लोकशाही दिनाचेसकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत  आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात नगररचना विभाग -३,  पाणीपुरवठा विभाग १, आरोग्य विभाग १, सार्वजनिक बांधकाम विभाग २, विद्युत विभाग २, अतिक्रमण विभाग १ तर नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त ५ अशा एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता सुनील साळुखे, विद्युत विभाग उपभियांता एस. एस. पाटील, प्रभाग समिती १ अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, प्रभाग समिती २ अधिकारी राजेंद्र पाटील, प्रभाग समिती ३ अधिकारी बाळासाहेब चव्हाण, प्रभाग समिती ४ अभियंता उदय पाटील व खाते विभाग प्रमुख उपस्थित होते.  दरम्यान, काही मागील लोकशाही दिनात तक्रार अर्ज देवून देखील त्यांच्या तक्रारींचे निवारण न झाल्याने असे तक्रारदार आज देखील आले होते. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संबधित विभाग प्रमुखांना त्यांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना दिल्यात. दरम्यान, लोकशाही दिन याश्वितेसाठी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र पाटील  यांचे सहकार्य लाभले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!