भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरचं मद्य विक्रीस परवानगी देणे गरजेचे होते का ? असा प्रश्न डॉ. नितु पाटील यांनी ‘पटत का बघा ?’ या सदरातून उपस्थित केला आहे. मद्य विक्रीचे फायदे-तोटे त्यांनी समजावून सांगितलेले आहेत. तसेच शासकीय महसूल वाढविण्यासाठी मद्य विक्रीस परवानगी देण्यापेक्षा डॉ. पाटील यांनी इतर विविध उपाय सुचविले आहेत. आजच्या सदरात त्यांनी “ मद्यविक्री ला पण आधार कार्ड जोडणी सक्तीची करण्याबाबत फायदे सांगीतले आहेत.
बँकेत खाते उघडायचे आहे … आधार कार्ड नंबर दया
रहिवास पुरावा हवा आहे …. आधार कार्ड नंबर दया
घरगुती गॅस जोडणी हवी आहे….. आधार कार्ड नंबर दया
स्वस्त धान्य दुकानात नोदणी करायची आहे…. आधार कार्ड नंबर दया
नवीन भ्रमणध्वनी हवा आहे….. आधार कार्ड नंबर दया
स्थावर जंगम मालमत्ता नोंदणी करायची आहे …. आधार कार्ड नंबर दया
खरेदी-विक्री करायची आहे…… आधार कार्ड नंबर दया
रेल्वे तिकीट आरक्षित करायचे आहे…… आधार कार्ड नंबर दया
बाळ जन्माला आले ….. आधार कार्ड नंबर काढा
प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड ची नोंदणी हि गरज झाली आहे.त्याचप्रमाणे माझे मत आहे की,
“ मद्यविक्री ला पण आधार कार्ड जोडणी सक्तीची करावी ? “
फायदे:-
१. अवैधरीत्या विकली जाणारी मद्य विक्री थांबेल.
२. अवैधरीत्या विकली जाणारी अवैधमद्य (illegal liquor) विक्री थांबेल.
३. शासन प्रमाणितच मद्य विक्री जास्त प्रमाणात विकली जाणार.
४. जास्तीत जास्त महसूल जमा होणार.
५. दर वर्षांनी सदर ग्राहकाचा हिशोब करायचा म्हणजे सदर ग्राहक दारिद्र रेषेखालील आहे की नाही याचा अभ्यास करावा. म्हणजे सदर योजेनेवर होणारा खर्च वाचवला जाणार आणि राहिलेले महसूल विकास कामासाठी वापरता येणार.
६. खराब दारू पिल्यामुळे होणारे आरोग्याची हानी होणार नाही,त्यामुळे पुढचा खर्च वाचेल.
टीप:- याबाबतीत तेलंगणा राज्याने पुढाकार घेतला आहे….
डॉ.नितु पाटील,
०८०५५५९५९९९