महसूल पथकाच्या तावडीतून वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून चालक पसार

मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील भरवस गावाजवळून अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई केली होती. वाळूने भरलेले ट्रॅक्टर मारवड पोलीस ठाण्यात नेत असतांना ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला न जुमानता ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ७ मे रोजी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील भरवस गावाजवळू अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याने तलाठी विकास परदेशी यांनी रविवारी ७ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता कारवाईसाठी निघाले. दरम्यान भरवस ते एकलहरे दरम्यानच्या रस्त्यावरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसून आले. वाळू वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसल्याने ट्रॅक्टर चालक गणेश मोतीलाल पाटील रा. सबगव्हाण ता. अमळनेर याला वाळूने भरलेले ट्रॅक्टर मारवड पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले. त्यानुसार महसूल पथक सोबत असतांना ट्रॅक्टर चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून बाजूच्या शेतातून पसार झाला. याप्रकरणी तलाठी विकास परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक गणेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content