‘मसाका’तील अवैध वृक्षतोडीची चौकशी करा : राकेश फेगडे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखान्याचील अवैध वृक्षतोडीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश फेगडे यांनी केली आहे.

राकेश फेगडे यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात नमूद केले आहे की, जिल्ह्यात साखर उत्पादनात आघाडीवर असलेला व तालुक्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांची आत्मा असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना बंद झाल्यापासुन तालुक्यातील उस उत्पादक शेतकर्‍यांची दयनिय अवस्था झाली आहे. जिल्हा बँकेने कर्जवसुली साठी विक्री केलेल्या कारखान्याच्या आवारातुन स्वच्छतेच्या नांवाखाली पन्नास वर्षापुर्वी मोठया प्रमाणात लावण्यात आलेल्या जिवंत वृक्षाची खुलेआम तोड करण्यात येत आहे.

जिल्हा बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी खाजगीत विकण्यात आलेल्या न्हावी तालुका यावल येथील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीस काढल्यापासुन विविध प्रकारे गोंधळ निर्माण झाले आहेत. यात खाजगी कंपनीने कारखाना आवारातील मागील पन्नास वर्षापुर्वीची बहुमुल्य अशी लावण्यात आलेली वृक्षाची परिसर स्वच्छ करण्याच्या नांवाखाली मोठया प्रमाणावर व्यवस्थापकाकडुन बेकायदेशीर कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडेल असे घातक कृत्य करण्यात आले असुन या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व संबधीतांवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व उस उत्पादक शेतकरी राकेश वसंत फेगडे यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: