मसाकाच्या आवारातील बेकायदेशीर वृक्षांची कत्तल !

व्यवस्थापकावर कायद्याशीर कारवाईची मागणी; तहसीलदारांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर साखर कारखाना आवारातील लाखो रुपयांच्या वृक्षची बेकायद्याशीर तोड होत असल्याची तक्रार सावखेडा सिम येथील ऊस उत्पादक शेतकरी व सामाजीक कार्यकर्त विजय पाटील यांनी केली होती. परंतू निवेदन देवूनही कोणतीही कारवाई न केल्याने फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर साखर कारखाना आवारातील लाखो रुपयांच्या वृक्षची बेकायद्याशीर तोड होत असल्याची तक्रार सावखेडा सिम येथील ऊस उत्पादक शेतकरी व सामाजीक कार्यकर्त विजय पाटील यांनी फैजपुर विभागाचे प्रांतअधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार आणी वनविभाग पूर्वचे विक्रम पदमोर यांना लिखित निवेदन दिले होते. तक्रारीनंतर संबंधित व्यवस्थापक व ठेकेदारांवर कारवाई होत नसल्यामुळे फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे व यावल कृउबा माजी सभापती तुषार पाटील, नावरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच समाधान पाटील, ललित चौधरी व अन्य कार्यकर्ते यांनी मंगळवारी ३ जानेवारी २०२३ रोजी तहसीलदार महेश पवार यांची भेट घेऊन संबंधितांवर आजपर्यंत कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला.

मधुकर सहकारी साखर कारखाना येथील ४० ते ५० वर्षापासून वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्षारोपणाद्वारे झाडे लावण्यात आली होती. त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांना मोठे करण्यात आले होते. मधुकर सहकारी कारखाना येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता ते जुने वृक्ष त्यांची परस्पर विल्हेवाट लावताना दिसत आहे. यात शासनाचे व कारखान्याचे तसेच पर्यावरणाचे फार मोठे नुकसान झालेले आहेत. संबंधित मधुकर सहकारी साखर कारखाना येथील व्यवस्थापकावर व त्यांच्या सहकारी मित्रांवर वनकायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content