मविआच्या उमेदवाराला आमचा पाठींबा – आ. शिरीष चौधरी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नासिक पदवीधरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारालाच आमचा पाठिंबा असेल तसेच आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक नसून विधानसभाच आपले लक्ष असल्याचे वक्तव्य पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना कॉग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी यांनी रावेरात केली आहे.

“हात से हात जोडो यात्रा अभियान” यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रर्यत्न करावे महागाई बेरोजगारी मुळे सर्व-साधारण जनता त्रस्त झाली आहे. यासाठी रावेर तालुक्यात सुरु होणा-या अभियानामध्ये जास्तीत-जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे अवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.ते कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात “हात से हात जोडो अभियान” यात्रा संदर्भात कार्यकर्तेशी बोलत होते.यावेळी त्यांनी भाजपा सत्तेत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय धोरणांवर प्रचंड आगपाखड केली. यावेळी बैठकीला कॉग्रेस समन्वयक डी.डी. पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, दारा मोहम्मद, कॉग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, महीला कॉग्रेस अध्यक्षा मानसी पवार, भूपेंद्र जाधव पिंटु पवार, भाग्यश्री पाठक, राजू सुवर्णे, दिल रुबाब तडवी, रामदास लहासे, सावन मेढे आदी कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. काँगेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आ. चौधरींनी होम ग्राउंडवर घेतलेल्या बैठकीला मोजकीच उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content