मल्हारसेनेच्या जिल्हाप्रमुख गजानन निळे तर सांस्कृतिक महासंघ जिल्हाध्यक्षपदी प्रवीण धनगर

जळगाव, प्रतिनिधी | येथील धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेनाच्या जिल्हाप्रमुखपदी गजानन निळे (रावेर लोकसभा क्षेत्र) यांची तर धनगर समाज सांस्कृतिक महासंघ जिल्हाध्यक्षपदी प्रविण धनगर या दोघांची नुकतीच एका बैठकीत निवड करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना, सांस्कृतिक महासंघ यांची नुकतीच जिल्हा बैठक संपन्न झाली. या बैठकीत धनगर समाजातील बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव सुभाष सोनवणे, मल्हारसेना प्रदेश सदस्य संदिप तेले, अहिल्या महिला संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा न्हाळदे, सांस्कृतिक महासंघाच्या प्रदेश सदस्या वसुंधरा लांडगे उपस्थित होते.

जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघाचे माजी प्रमुख प्रभाकर न्हाळदे यांनी निवडी जाहीर केल्या. यात धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेनाच्या जिल्हाप्रमुखपदी गजानन निळे (रावेर लोकसभा क्षेत्र) यांची तर धनगर समाज सांस्कृतिक महासंघ जिल्हाध्यक्षपदी प्रविण धनगर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, विष्णु ठाकरे, सुभाष करे, रमेश सोनवणे, अरुण ठाकरे, दिलीप धनगर, गणेश बागुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आली.

याप्रसंगी रावेर माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालकपदी नुकतेच निवडून आलेले पंडित धनगर यांचा सत्कार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. निवड झाल्याबद्दल रघुनाथ सोनवणे, रामचंद्र चर्‍हाटे, हिलाल सोनवणे, धर्माभाऊ सोनवणे, नामदेव सावळे, महेंद्र सोनवणे, डाॅ.संजय पाटील, संदिप मनोरे, हरीभाऊ हिवराळे, भरत यवस्कर, राहुल सुशिर, रमेश झटके, भुषण ठोके, स्वप्निल सावळे, दिनेश झटकार, डि.बी.पांढरे, शेषराव वलकर, सखाराम बनसोडे, विजय पवार, प्रविण पवार, तुळशिराम सोनवणे, संतोष कचरे, दिलिप नाझरकर, सुनिल खोमणे, पांडूरंग पवार इ. मान्यवरांनी अभिनंदन केले. याप्रसंगी जळगाव, रावेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर येथिल समाजबांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content