मुंबई : वृत्तसंस्था । अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘चंपा’ उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी पंढरपुरात सभेत पुन्हा ‘चंपा’असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचलं होतं. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो असा टोला त्यांनी लगावला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.