मला खासदार करण्यात राज्यमंत्री सत्तारांचा सिंहाचा वाटा- इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे असा गौप्यस्फोट खा. इम्तियाज जलील यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

एमआयएमकडून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेनेला आलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण तापले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की, ‘२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मला सत्तार यांची मोठी मदत मिळाली. त्यामुळे मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे.’ शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांची मदत मला मिळाली आणि माझ्या विजयी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी इम्तियाज जलील यांच्यासोबत असलेली मैत्री घट्ट आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

देशासह जगाची चिंता वाढवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासक प्रयत्न करत आहेत. तर कोरोना आला कसा याची अधिकृत पुष्टी अजूनही होऊ शकली नाही. असे असतानाच ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने मात्र अजबच दावा केला आहे. सर्वत्र अन्याय-अत्याचार वाढल्यानेच कोरोना आला असल्याचा दावा राज्य महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!