मर्डर : प्रेयसीला दुसऱ्याच्या मिठीत पाहताच तरुणाचा खून करणारा संशयित ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या प्रेयसीला दुसऱ्याच्या मिठीत पाहताच संतापाच्या भरात तरूणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासात अनैतिक संबंधातून ही दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी तो शिवाजी नगरात राहणार्‍या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघे एका खोलीत बसलेले असतांना त्याठिकाणी विवाहित प्रेयसीलचा दुसरा प्रियकर आकाश सखाराम सोनवणे हा तिथे आला. आकाश घरी आल्यानंतर समोरील चित्र पाहून धक्काच बसला. आपल्या प्रेयसिला नरेशच्या मिठीत बघताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले या वादातून आकाशने धारदार शस्त्राने भोसकून नरेशचा निर्घुण खून केला. या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नरेशच्या पाठीवर, पोटावर व मांडीवर धारदार शस्त्राने वार केले होते. या मुळे नरेश जागीच ठार झाला होता. नरेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांनाच आकाश व त्याच्या प्रेयसीने घटनास्थळाहून पळ काढला होता. दरम्यान, शहर पोलीसांनी संशयित आरोपी आकाश सोनवणे याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. गेल्या चोवीस तासात दुसरी घटना घडल्याने जळगाव प्रचंड खळबळ उडाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content