मराठी विज्ञान परिषदेतर्फे “प्रयोगातून विज्ञान” कार्यक्रम संपन्न

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरीता मराठी विज्ञान परिषदतर्फे  शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी “प्रयोगातून विज्ञान” उपक्रम राबविण्यात आला.

 

व्यवस्थापन विभागाचे,प्रमुख (हेड) प्रा.डॉ. प्रज्ञा विखार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानी विद्यार्थ्यांना विज्ञान, त्यांच्या संकल्पना, प्रयोगातून विज्ञान, होणारा कार्यक्रम याविषयी  सविस्तर विवेचन केले. यावेळी  डीगंबर कट्यारे यांनी मराठी विज्ञान परिषद  घेत असलेल्या कार्यक्रमाविषयी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याची माहिती दिली. “प्रयोगातून विज्ञान”  या उपक्रमात  जवळपास १०० विद्यार्थी सहभागी झाले  होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक डॉ. संजय कुमावत यांनी केली

कार्यक्रमादरम्यान मराठी विज्ञान परिषद सचिव प्रा. दिलीप भारंबे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागासह, भौतिक शास्त्रातील विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांना त्यामागील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. यावेळी त्यांनी भौतिकशास्त्राचे प्रयोग दाखवले, सर्व प्रयोग आजूबाजूला सहजासहजी मिळणाऱ्या वस्तूंपासून बनवलेले होते. १२वी पर्यंत विद्यार्थ्यांनी जीवनात फक्त कागदावरच विज्ञान शिकले . आज विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयोग स्वतः टेबलवर बघितले, काही प्रयोग स्वतः करून बघितले, सर्व विद्यार्थ्यांकरिता हा जीवनातला पहिला विज्ञान शिकण्याचा आनंददायी कार्यक्रम होता असं विद्यार्थ्यांनी समारोप प्रसंगी सांगितले.प्रा. डॉ किरण पाटील  यांनी आभार मानले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभागातील प्रा. सौ. नारखेडे, व इतर सर्व प्राध्यापक ,कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content