मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्ती देवून नवीन कर्ज देण्याची भादलीकरांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करून नवीन कर्ज मिळवी, अशी मागणी तालुक्यातील भादली बु ।। येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.

store advt

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत तत्कालीन मयत शेतकरी यांचे मृत्यूचे दाखले घेऊन त्यांच्या वारसांकडून संमतीपत्र घेऊन कर्जमाफीची सुविधा उपलब्ध करून द्यावी व शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठीचा ७/१२ कोरा करून मिळावा. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबाबत सविस्तर माहितीसह शेतकऱ्यांची मागणी नवीन आघाडी सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे कोणताही शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यानुसार आपण सहकार क्षेत्रात तज्ञ अभ्यासकांची समिती नेमून या मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून द्यावा. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर पात्रता यादीतील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. परंतु भादली बु ।। गावासह महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे मृत्यु पश्चात कर्जमुक्तीच्या पात्रता यादीत नाव आल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण (लिंक) करायचे कसे? ती सेवा शासनाने सहकारी सोसायट्यांना उपलब्ध करून द्यावी. म्हणजे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे या शेतकरी कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केली आणि त्यानुसार नावे जिल्ह्यासह पात्र शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जाहीर झाल्या. परंतु कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्रता यादीमधील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणित करणे गरजेचे आहे. मात्र या यादीमधील हजारो शेतकरी हयात नसल्याने ते मृत्यु पावले आहे तर त्या मुलांचे आधार कसे प्रमाणित करायचे ? ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी स्वत:चे आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ मिळवला असता त्यांचे प्रमाणिकरण रद्द होते कोणतेही संगणकात येत नाही. तरी कर्जमुक्तीचा लाभ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सुरू करावी आणि जिल्हानिहाय हेल्पलाईन कार्यरत करावी. जेणेकरून मृत व्यक्तीच्या वारसांना कर्जमुक्ती मिळणार आहे. या निवेदन देतांना मयत शेतकरी चावदस राघो पाटील यांचे वारसदार प्रमोद चावदस पाटील, किशोर चौधरी, मिलींद चौधरी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!