मनावर दगड ठेवून. . .चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधक त्यांची खिल्ली उडवत असतांनाच शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली आहे.

पनवेल येथे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. याचे जोरदार पडसाद उमटले. शरद पवार यांनी त्यांची खिल्ली उडवत दगड हा डोक्यावर ठेवला की पोटावर ? असा प्रश्‍न विचारत त्यांना टोला मारला. तर सोशल मीडियातूनही यावर मोठी ट्रोलींग सुरू झाली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे उडालेला गोंधळ पाहून दिल्लीतून त्यांना भाजपच्या सोशल मीडियात अकाऊंटवरून हा व्हिडीओ डिलीट करण्याचे सांगण्यात आले. मात्र तोवर अनेकांनी हा व्हिडीओ डाऊनलोड करून शेअर केल्यामुळे आता यावरून सोशल मीडियात तुफान चर्वण सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: