मनसेच्या मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी अतुल जावरे तर तालुकाध्यपदी मधुकर भोई

Atul Jaware as MNS Muktainagar assembly constituency president and Madhukar Bhoi as taluka president

मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी अतुल जावरे यांची निवड करण्यात आली आहे. मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व जनहित विधी व न्याय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाने जळगाव येथे पक्षाचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम व जिल्हा सचिव जमील देशपांडे  रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर जनहित यांच्याहस्ते मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मधुकर भोई तर मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्र अध्यक्ष पदी  अतुल जावरे यांची नियुक्ती पक्षाच्या देशाने करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पक्ष संघटना व पक्षवाढीसाठी काम करण्यात यावे, असे आदेश जनहित व विधी न्या बीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड.किशोर शिंदे यांनी दिली व रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर व व उपजिल्हाध्यक्ष राहुलभाऊ काळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!