मनवेल येथील वयोवृध्दाने विहिरीत घेतली उडी

यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल येथील एका वयोवृद्ध व्यक्तिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, योगराज पांडुरंग पाटील (वय-७०) यांनी ५ जानेवारी गुरूवार रोजी सायंकाळच्या ५ वाजेपासुन रात्री १२.३० वाजेच्या (दरम्यान निश्चित वेळ माहीत नाही). यांनी साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील विहीरीत आजाराच्या त्रासामुळे मानसीक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेत साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील सायंकाळी ५ ते रात्री १२.३० वाजेच्या सुमारास विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची मयताचे भाऊ नरेंद्र जगन्नाथ पाटील यांनी खबर यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content