मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्राचाच नंबर ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) राजस्थानातील राजकीय घडामोडी पाहता, मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

store advt

 

आठवले यांनी मंगळवारी एक व्हिडिओ मेसेज जारी केला. यामध्ये महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होणार असून या ठिकाणी भाजप सरकार स्थापित करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सचिन पायलट आणि तयांच्या समर्थकांनी भाजपशी हातमिळवणी केल्यास राजस्थानातून काँग्रेसची सत्ता टिकणार नाही. काँग्रेसमध्ये आता पायलट यांना मान राहिलेला नाही. त्यामुळे, पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असेही आठवले म्हणाले आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!