मद्रास हायकोर्टात विराट कोहलीच्या अटकेसाठी याचिका

शेअर करा !

चेन्नई (वृत्तसंस्था) ऑनलाईन जुगारामुळे तामीळनाडूमध्ये तरुणांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन जुगार चालवणाऱ्यांवर आणि याची जाहिरात करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. चेन्नईतले वरिष्ठ अधिवक्ता एपी सूर्यप्रकाशम यांनी ही याचिका दाखल केली आहे.

store advt

 

याप्रकरणाची सुनावणी ४ किंवा ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या याचिकेमध्ये ऑनलाईन जुगाराची तुलना ब्लू व्हेल चॅलेंज गेमशी करण्यात आली आहे. ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे अनेकांनी आपला जीव गमावला होता. तरुणांना या ऑनलाईन जुगाराचे व्यसन लागले आहे, कारण या गेममध्ये लोकांना कॅश बोनस देण्यात येत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या गेमला प्रसिद्धी देण्यासाठी क्रिकेट आणि चित्रपटातल्या दिग्गजांचा वापर केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, तमन्ना भाटिया यांच्यासारखे सेलिब्रिटी तरुणांचा ब्रेन वॉश करतात. तरुण टाईमपास म्हणून हा गेम खेळायला सुरूवात करतात, पण जेव्हा याचे व्यसन लागते, तेव्हा तरुण कर्ज घेतात. मोठे नुकसान झाल्यावर त्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही, मग ते आत्महत्या करतात, असा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!